एक्स्प्लोर

आता लक्ष्य एकच... टोकियो ऑलिम्पिक

विनेश फोगाट ही एशियाडचं सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला पैलवान ठरली. विनेश फोगाटने जपानच्या युकी इरीचा 6-2 असा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

Asian Games 2018 : भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला पैलवान ठरली. ‘दंगल’फेम पैलवान महावीरसिंग फोगाट यांच्या लेकीने म्हणजे गीता फोगाटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताला 2010 साली पहिल्यांदाच महिला कुस्तीचं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. तिचीच चुलत बहीण असलेल्या विनेशने एशियाडच्या मॅटवर फोगाट कुटुंबीयांच्या त्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली. पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये नवा इतिहास घडवला. विनेश फोगाट ही एशियाडचं सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला पैलवान ठरली. विनेश फोगाटने जपानच्या युकी इरीचा 6-2 असा पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ विनेशचं हे सलग दुसरं सुवर्णपदक ठरलं. रिओ ऑलिम्पिकच्या मॅटवर झालेल्या गंभीर दुखापतीने विनेशचं आव्हान संपुष्टात आणलंच, पण ती पुन्हा कुस्ती खेळू शकेल का याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण हरयाणवी वीरांगनेने आपल्या फिटनेसवर कठोर मेहनत घेऊन दुखापतीवर मात केली आणि आधी कॉमनवेल्थ गेम्स आणि मग एशियाडमध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली. विनेश फोगाटला 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण त्यामुळे निराश न होता तिने आपला आदर्श असलेल्या सुशील कुमारचा दिलेला सल्ला शिरसावंद्य मानला. विनेश म्हणते की, 2014 सालच्या एशियाडमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागल्यावर सुशीलकुमार तिला म्हणाला होता... निराश होऊ नकोस. जे घडतं ते चांगल्यासाठी असतं. कदाचित यापेक्षाही जास्त मोठं यश तुझ्या नशिबात नक्कीच लिहिलेलं असेल. सुशीलकुमारचे ते शब्द खरे ठरले आहेत. विनेश फोगाटच्या खात्यात लागोपाठच्या दोन एशियाडमधल्या दोन पदकांशिवाय आणखीही पदकं जमा झाली आहेत. 2014 आणि 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. 2013 ते 2018 या कालावधीतल्या पाच आशियाई कुस्ती स्पर्धांत तिने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. राष्ट्रकुल कुस्तीचेही एक रौप्यपदक तिच्या खजिन्यात जमा आहे. दुखापत हा खेळाडूंच्या कारकीर्दीतला अविभाज्य घटक असतो. छोट्यामोठ्या दुखापतीनंतर निराश न होता, आधी फिटनेसवर आणि मग खेळावर मेहनत घेतली तर त्या खेळाडूला नव्यानं कारकीर्दीची बांधणी करता येऊ शकते. विनेश फोगाटने ते करून दाखवलं आहे. म्हणूनच भारतीय कुस्तीला आता तिच्याकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget