Maharashtra: चिपळून येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (SVJCT Sports Complex) क्रीडांगणावर आज पासून सुरू झालेल्या सातव्या सब ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल (Sub Junior National Dodgeball Tournament) चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी पी.एस. ब्रार हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून एन आय एस बॉक्सिंग कोच गुरवीर सिंग शाही, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ हनुमंत लुंगे, उपाध्यक्ष राजेश जाधव, एसव्हीजेसीटीचे क्रिडा संचालक श्रीकांत पराडकर स्पर्धा निरीक्षक ख्वाजा अहमद, मनोज खरात, रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे विनायक पवार, अविनाश पवार आदी उपस्थित होते.
 
डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र असोसिएशन आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने 13 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत तामिळनाडू,पंजाब,चेन्नई,चंदीगड,आंध्र प्रदेश,दिल्ली,गोवा,हरियाणा, गुजरात, कर्नाटक,हिमाचल प्रदेश, राजस्थान,वेस्ट बंगाल,मध्य भारत,मध्य प्रदेश,बिहार,तेलंगणा,उत्तर प्रदेश व महाराष्ट्र आदी  23 राज्यातील मुलांच्या 23 तर मुलींच्या 20 संघातील एकूण 520खेळाडू व 100अधिकारी, पंच यांनी सहभाग नोंदविला आहे.


प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण 
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व मशाल प्रज्ज्वलित करण्यात आले.जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू स्वराज जोशी, क्रांती म्हैसकर,शुभम सूर्यवंशी,साक्षी जदयाल,श्रावणी वालावलकर या राष्ट्रीय खेळाडूनी स्पर्धेची मशाल पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली.23 राज्यातील खेळाडूंनी शिस्तबद्ध पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिले.


कोकणी संस्कृतीचे दर्शन
गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करून कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविले.तर एस व्ही जे सी टी इंग्लिश मीडियम स्कूल डेरवण येथील विद्यार्थ्यांनी आकर्षक झांज नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली.मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनात एस व्ही जे सी टी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनमोहक योगा नृत्य  व मल्लखांब वरील चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.
उद्घाटक प्रशांत यादव यांनी कोकण भूमीने महाराष्ट्राला कबड्डी व इतर खेळात नामांकित खेळाडू दिले असून डॉजबॉल मध्ये देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा आशावाद दर्शविला.डॉ.हनुमंत लुंगे यांनी 
डेरवण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी  हजारो गरीब खेळाडूंना करीत असलेले आर्थिक मदत महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असल्याचे आवर्जून उल्लेख करीत डॉजबॉल खेळाचा इतिहास व विकासाचा भाषणातुन वाढावा घेतला.
कार्यक्रमाचे संचालन अश्विनी खांडेकर प्राची गोखले यांनी केले आभार जिल्हा डॉजबॉल सचिव उदय कळंबे यांनी मानले.


बॉक्स-उद्घाटनीय सामन्यात महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाचा दमदार विजय
उद्घाटनीय सामना मुलांच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब संघादरम्यान खेळविण्यात आला. यात महाराष्ट्र संघाच्या वेदांत गायकवाड,ओम कोकाटे,जयेश बिराजदार या खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा 6-0 आणि 7-0 अशा सरळ दोन सेटमध्ये दारून पराभव केला. तर मुलींच्या गटात महाराष्ट्र संघानं हरियाणा संघाचा 3-0 आणि 9-0 नं पराभव करीत विजयी आगेकुच केली. विजयी संघातर्फे वंशिका अमाने, श्रेया व प्रज्ञा माने यांनी चांगला खेळ केला.


हे देखील वाचा-