ISSF World Championships 2022: इजिप्तची (Egypt) राजधानी कैरो (Cairo) येथील आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याचा (Thane) नेमबाज रुद्रांक्ष (Rudrankksh Patil) पाटीलनं नवा पराक्रम केलाय. या स्पर्धेतील पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्यानं सुवर्णपदक पदक जिंकलं. रुद्रांक्ष पाटीलच्या या अप्रतिम कामगिरीनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची मान गर्वानं उंचावली आहे. महत्वाचं म्हणजे, भारताचा स्टार नेमबाज अभिनव बिंद्रानंतर (Abhinav Bindra) 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकणारा रुद्रांक्ष पाटील दुसरा खेळाडू ठरलाय. अभिनव बिंद्रानं 2006 मध्ये हा पराक्रम केला होता. दोन आठवड्यांपूर्वी रुद्रांक्ष पाटीलनं नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत त्यानं अर्जुन बाबुतचा पराभव केला होता.


ट्वीट-







इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोला 17-13 नं हरवलं
रुद्राक्ष प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या 18 वर्षीय रुद्रांक्ष पाटीलनं इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा 17-13 असा पराभव केला. या सामन्यात एका क्षणी तो पिछाडीवर होता. पण नंतर त्यानं शानदार पुनरागमन करत सामना जिंकला. यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिकसाठी चार खेळाडूंची निवड केली जाणार आहे.


अभिनव बिंद्राची 2006 मधील कामगिरी
रुद्राक्षने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावलं होतं आणि क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहून ऑलिम्पिक कोटा मिळवला. बीजिंग ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रानं 2006 मध्ये क्रोएशियातील झाग्रेब येथे 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.


रुद्रांक्ष पाटीलची पार्श्वभूमी
रुद्रांक्ष हा भारताचा एकूण सहावा विश्वविजेता नेमबाज आहे. त्यापैकी फक्त बिंद्रानं ऑलिम्पिक पदक जिंकलंय. रुद्रांक्षच्या सुवर्णामुळं त्याला 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिकीट मिळालं आहे. रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मोठा मुलगा आहे. त्याची आई हेमांगिनी या नवी मुंबईतील वाशी येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळं त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यानं ही कामगिरी केली आहे.


हे देखील वाचा-