एक्स्प्लोर
सानिया-मार्टिना विभक्त, टेनिस दुहेरीतील साथ संपुष्टात
मुंबई : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या इंडो-स्विस जोडीनं आता टेनिस दुहेरीत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गेल्या वर्षभरात सानिया आणि मार्टिनानं नऊ किताब आणि डब्ल्यूटीए विजेतेपद जिंकून महिला दुहेरीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. त्या दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
सानियानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं हिला दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली होती. सानिया यापुढच्या काळात चेक रिपब्लिकच्या बार्बरा स्ट्रायकोवाच्या साथीनं खेळणार असून, अमेरिकेची कोको वॅन्देवेघे ही मार्टिनाची जोडीदार बनली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement