एक्स्प्लोर
Advertisement
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई : दुखापतीमुळे बाहेर गेलेला टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे, तर पार्थिव पटेलला वगळण्यात आलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. हा कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबादमध्ये खेळवण्यात येईल.
पार्थिव पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये आठ वर्षांनी पुनरागमन करत इंग्लंडविरुद्ध शानदार प्रदर्शन केलं होतं. मात्र यावेळी त्याच्याऐवजी रिद्धीमान साहाची निवड करण्यात आली आहे. तर अभिनव मुकुंद याचंही पुनरागमन झालं आहे.
जयंत यादव आणि सलामीवीर मुरली विजय दुखापतीतून सावरले असून त्यांचाही संघात समावेश केला आहे.
कसोटीसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इशांत शर्मा अभिनव मुकुंद आणि हार्दिक पंड्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement