एक्स्प्लोर
विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर
निवड झालेल्या 14 सदस्यीय भारतीय संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंत हा एकमेव नवा चेहरा असेल. रिषभ पंतचा दिनेश कार्तिकच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समितीनं 14 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला. निवड झालेल्या भारतीय संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंत हा एकमेव नवा चेहरा असेल. रिषभ पंतचा दिनेश कार्तिकच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि विंडीजमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 21 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. पहिल्या दोन वन डेसाठीचा भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार) शिखर धवन अंबाती रायुडू लोकेश राहुल मनिष पांडे महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक) रिषभ पंत रवींद्र जाडेजा यजुवेंद्र चहल कुलदीप यादव मोहम्मद शमी खलील अहमद शार्दूल ठाकूर
🚨Team for first 2 ODIs against Windies announced Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Ambati Rayudu, Manish Pandey, MS Dhoni (wk),Rishabh Pant, R Jadeja, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Khaleel Ahmed, Shardul Thakur, KL Rahul #INDvWI
— BCCI (@BCCI) October 11, 2018
आणखी वाचा























