एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा अव्वल
कानपूर : कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडवरच्या या विजयामुळे टीम इंडियाने कसोटीच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठलं आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात आता प्रत्येकी 111 गुण जमा झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळालं होतं. मात्र भारताच्या आज विजयामुळे पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला आयसीसीने दिलेली प्रतिष्ठित गदा अवघ्या सहा दिवसातच परत घेतली जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान खालोखाल 108 गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
सध्याची कसोटी रँकिंग
- भारत - 111 गुण, पाकिस्तान - 111 गुण
- ऑस्ट्रेलिया - 108 गुण
- इंग्लंड - 108 गुण
- दक्षिण आफ्रिका - 96 गुण
- श्रीलंका - गुण
- न्यूझीलंड - 95 गुण
- वेस्ट इंडीज - 67 गुण
- बांगलादेश - 57 गुण
- झिम्बाब्वे - 8 गुण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement