एक्स्प्लोर

भारत सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत

या कसोटीत भारतीय संघाने विजयासोबत आणखी मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

कोलंबो : श्रीलंकेने कोलंबो कसोटी वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात केलेला कठोर संघर्ष अखेर अयशस्वी ठरला. टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसरा डाव 386 धावांत रोखून, कोलंबो कसोटीत एक डाव आणि 53 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली. जाडेजा आणि अश्विन या दोघांनीही प्रत्येकी 7 विकेट घेतल्या. भारतीय फलंदाजांनीही या कसोटीत चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केला होता. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी खेळी आणि अश्विन, जाडेजाच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने मोठी मजल मारली. पुजारा 133 आणि अजिंक्य रहाणे 132 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या अश्विन आणि साहा आणि जाडेजाने अर्धशतकं झळकावत टीम इंडियाला 600 धावांचा टप्पा पार करुन दिला. या कसोटीत भारतीय संघाने विजयासोबत आणखी मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. सलग जास्त वेळा कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सर्वाधिक वेळा सलग कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड भारताच्या पुढे आहेत. इंग्लंडने 1884 ते 1898 या काळात सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या. त्यानंतर जवळपास 116 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात 2005-06 ते 2008 या काळात सलग 9 कसोटी मालिकांवर आपलं नाव कोरलं. आता 125 वर्षांनंतर सलग 8 कसोटी मालिका जिंकून भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 2015 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरुन या विजय रथावर स्वार झाला. त्यानतंर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेला भारताने पराभवाची धूळ चारली. विशेष म्हणजे या सर्व कसोटी मालिका भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget