एक्स्प्लोर
आयपीएलच्या प्रेक्षकांना टाटा नेक्सन कार जिंकण्याची संधी!
आयपीएल 2018ची सुरुवात 7 एप्रिलपासून होणार आहे. यावेळी आयपीएल प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे.
मुंबई : आयपीएल 2018ची सुरुवात 7 एप्रिलपासून होणार आहे. यावेळी आयपीएल प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे. आयपीएलदरम्यान स्टेडियममधील प्रेक्षकांना टाटा नेक्सन जिंकण्याची संधी मिळणार आहे.
पुढील तीन वर्ष टाटा नेक्सन आयपीएलमध्ये ऑफिशियल पार्टनर असणार आहे. टाटा मोटर्सने तसा करारच केला आहे. आयपीएल सामन्यादरम्यान, टाटा आपल्या या कारचं प्रमोशनही करणार आहे. तसंच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नेक्सन कार दिली जाणार आहे.
यासोबतच प्रेक्षकांनाही ही कार जिंकण्याची संधी आहे. प्रेक्षकांसाठी कंपनीने 'टाटा नेक्सन फॅन कॅच' ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सामन्यादरम्यान प्रेक्षकांमधील जो कोणी एका हातात कॅच पकडेल त्याला एक लाखापर्यंतचं बक्षीस मिळणार आहे. तसंच संपूर्ण आयपीएल सीजनमध्ये जो सर्वाधिक वेळा अशाप्रकारे कॅच घेईल त्याला टाटा नेक्सन कार दिली जाणार आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement