Wheat prices : गहू (Wheat) उत्पादकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्या गव्हाच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमती 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं आता मैदा, सुजी, बिस्किटे आणि ब्रेड यासारखे पदार्थ महाग देखील होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्थितीत सध्या लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला गव्हाचा साठा विकला आहे.


पावसाळ्यामुळे पुरवठा कमी झाल्याने आणि दळणाची मागणी वाढल्यानं गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं आता मैदा, सुजी, बिस्किटे आणि ब्रेड यांसारखे पदार्थ महाग होऊ शकतात. लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला गव्हाचा साठा विकला आहे, तर बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठे व्यापारी भाव आणखी वाढतील या अपेक्षेने साठा ठेवत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. या वर्षी प्रथमच, भारतीय अन्न महामंडळ अर्थात FCI कडील सरकारी एजन्सी मिलर्ससाठी उपलब्ध नाही.


दरम्यान, सध्या वाढत असलेल्या गव्हाच्या किंमतीच्या संदर्भात रोलर फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनीत चितलांगिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या गव्हाच्या किंमती दररोज वाढत आहेत, त्या तुलनेत सध्या गव्हाची उपलब्धता देखील अत्यंत कमी असल्याची माहिती रोलर फ्लोअर मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनीत चितलांगिया यांनी दिली. उत्तर भारतात वितरित होणाऱ्या गव्हाची किंमत जूनमध्ये 2 हजार 260 ते 2 हजार 270 प्रति क्विंटलच्या निचांकी वरुन आजपर्यंत 2 हजार 300 ते 2 हजार 350 पर्यंत वाढली आहे. त्यामुळं मोठ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होताना दिसत आहे.


जागातिक गहू उत्पादनात रशिया आणि युक्रेनचा 29 टक्के आणि मक्याच्या उत्पादनात 19 टक्के वाटा आहे. सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत या दोन्ही देशांचा 80 टक्के वाटा आहे. बार्ली उत्पादनात रशियाचा जगात दुसरा आणि युक्रेनचा चौथा क्रमांक लागतो. एकूणच जागतिक कृषी क्षेत्रात रशिया आणि युक्रेनचं मोठं योगदान आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे धान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी, गव्हाच्या किंमती देखील वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: