Neeraj Chopra World Athletics Championships 2022 Live: भारताचा स्टार भालेफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) गेल्या वर्षी एथलेटिक्समध्ये ऑलम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. त्यांनतर आता नीरज चोप्रा जागतिक जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झालाय. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 यूएसएच्या ऑरेगॉन येथे पार पडत आहे. आजपासून नीरज चोप्रा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचा प्रवास सुरू करणार आहे. या स्पर्धेत नीरजला ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सचकडून (Anderson Peters) कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.


शनिवारी अंतिम सामना
विशेष म्हणजे, एकूण 32 भालाफेकपटू दोन पात्रता गटांमध्ये स्पर्धा करतील. त्यानंतर 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. शनिवारी अंतिम सामना खेळला जाणार आहे. गेल्या महिन्यातच आपल्या हंगामाची सुरुवात करणाऱ्या नीरज चोप्रानं या वर्षी तीन स्पर्धांमध्ये दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. त्यानं स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम 89.94 मीटर भाला फेकून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडलाय.


नीरजला अँडरसन पीटर्सचकडून कडवं आव्हान मिळण्याची शक्यता 
या स्पर्धेत नीरज चोप्राला ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सकडून कडवे आव्हान मिळेल, असे मानले जात आहे. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स हा सध्याचा जगज्जेता आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्टॉकहोममध्ये नीरज चोप्राला पराभूत करून सुवर्णपदक जिंकताना त्याने यावर्षी तीनदा 90 चा टप्पा ओलांडला आहे.


कुठं पाहता येणार सामना?
भारतीय दर्शकन नीरज चोप्राचा सामना सोनी टेन 2 (Sony TEN 2) आणि सोनी टेन 2 एचडी (Sony TEN 2 HD) टीव्हीवर पाहू शकतात. याशिवाय सोनी लिव्ह (SonyLIV) वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.


हे देखील वाचा-