Javelin Throw in World Championship 2022: भारतीय भालाफेकपटू अनु रानीनं (Annu Rani) सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेच्या (Javelin Throw) फायनलमध्ये धडक दिलीय. तिनं गुरुवारी खेळण्यात आलेल्या 'ब' गटातील पात्रता फेरीत 59.60 मीटर भालाफेक केला. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आता 12 खेळाडू एकमेकांशी भिडणार आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये अनु रानीची सुरुवात खराब झाली. तिनं पहिल्या प्रयत्नात फाऊल थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 55.35 मीटर भालाफेक करून पुनरागमन केलं. तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात अनु रानी जबरदस्त कामगिरी केली. तिनं 59.60 मीटर भाला फेकून 'ब' गटातील पाचवं स्थान पटकावलं. तिनं 'अ' आणि 'ब' अशा दोन्ही गटातील गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहून फायनलचं तिकीट निश्चित केलं.
फायनलमध्ये 12 भालेफेकपटू आमने- सामने येणार
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आता 12 भालेफेकपटू आमने- सामने येणार आहेत. पात्रता फेरीत 62.50 मीटर अंतरावर भालाफेक करणाऱ्या खेळाडूंना थेट फायनलचं तिकीट मिळालं आहे. तीन खेळाडूंनी अशी कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिलीय.
अनु रानीची सर्वोत्तम कामगिरी
29 वर्षीय अनु राणीची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी 63.82 मीटर आहे. ही तिची एकूण सर्वोत्तम कामगिरी आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती या विक्रमापेक्षा खूप मागं होती. परंतु, असं असतानाही ती फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.
सलग दुसऱ्यांदात फायनलमध्ये धडक
याआधी 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अनु रानीनं स्थान मिळवलं होतं. या स्पर्धेत तीनं 61.12 मीटर भालाफेक केला. फायनलमध्ये ती आठव्या स्थानावर राहिली. लंडनमध्ये 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रता गटात अनु रानी 10 व्या स्थानावर राहिली आणि फायनलमध्ये प्रवेश करू शकली नव्हती.
हे देखील वाचा-
- CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान मोदींकडून विजयी मंत्र
- ICC Men’s ODI Rankings: बुमराहला मोठा धक्का! रोहित-विराटचीही घसरण, हार्दिक पांड्याची मोठी झेप
- South Africa T20 League: दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; मुंबई, चेन्नईसह 6 संघामध्ये रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार!