T-20 World Cup : अफगाणिस्ताननं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज नवा इतिहास घडवला. अफगाणिस्ताननं अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात अफगाणिस्तानला 20 षटकात 5 बाद 115 धावांचीच मजल मारता आली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी 19 षटकात 114 धावांचं आव्हान होतं. अफगाणिस्ताननं बांगलादेशला 18व्या षटकात 105 धावांवर रोखलं. दरम्यान या विजयामुळे आता ऑस्ट्रेलिया संघ थेट स्पर्धेच्या बाहेर फेकला असून अफगाणिस्तानने थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे.


29 जून रोजी अंतिम सामन्याचा थरार रंगणार


टी-20 विश्वचषकाच आठ साखळी सामने संपले आहेत. आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती उपांत्य फेरीची. सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळेच ही उपांत्य फेरी चांगलीच चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. येत्या 26 जून, 27 जूनला दोन उपांत्य सामने होतील आणि एका दिवासाच्या विश्रांतीनंतर 29 जून रोजी अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. 


उपांत्य फेरीचे दोन सामने कधी, कुठे होणार? 


उपांत्य फेरीचे दोन सामने हे 26 जून (बुधवारी) आणि 27 जून (जागतिक वेळेनुसार) रोजी होतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे दोन्ही उपांत्य सामने 27 जून रोजीच होतील. यातील पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात थेट लढत होईल. तारौबा येथील ब्रायन लारा मैदानावर हा सामना रंगेल. तर दुसरा सामना हा प्रोव्हिएन्स स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात होईल. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 27 जून रोजी सकाळी सहा वाजता चालू होईल. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होईल.


टी-20 विश्वचषकाची अंतिम लढत 29 जून रोजी होईल. हा सामना बार्बाडोस येथील ब्रिजटाऊन येथील केंसिंगटन ओव्हल मैदानवर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता चालू होईल. अंतिम सामन्यात भारताने धडक मारली तर हा सामना भारतीयांसाठी एक पर्वणीच ठरेल.


हेही वाचा :


आपल्या भावाचा नादच करायचा न्हाय; रोहितनं कांगारुंना पळवू पळवू धुतला, रेकॉर्ड्सचा धो-धो पाऊस पाडला!


T20 World Cup 2024 Ind vs Aus: 'टीम इंडियाने ते डोक्यात ठेवलं....'; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर शोएब अख्तरने केलं भरभरून कौतुक


India’s squad for tour of Zimbabwe announced: 'माझ्याकडे पण पीआर एजन्सी असती...'; वरुण चक्रवर्तीची पोस्ट, थेट बीसीसीआयशी घेतला पंगा?