T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर-8 च्या फेरीत काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात रोहित शर्मा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी सर्वात मोठे योगदान दिले. रोहितने 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये येऊन 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगने देखील भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट पटकावली.
अर्शदीप सिंगने भारताकडून पहिले षटक टाकले. या पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला आपल्या जाळ्यात फसवत झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श मैदानात उतरला. यावेळी चौथ्या चेंडूवर मिचेल मार्कला बाद करण्याची चांगली संधी आली होती. बॉल ग्लोव्हजला लागून खूपच वर चढला अशा स्थितीत ऋषभ पंतच्या हातात झेल होता. मात्र एक चूक झाली आणि झेलपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. मिचेल स्टार्कचा झेल सोडला तेव्हा त्याने आपलं खातंही खोललं नव्हतं. महत्त्वाच्या सामन्यात चूक केल्याने रोहितलाही राग अनावर झाला. यावेळी रोहितला इतका चिडताना कधी बघतिला नसल्याचं देखील सांगितलं जात आहे.
नेमकं काय घडलं?, पाहा व्हिडीओ-
ट्रेव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी ठरला-
भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड पुन्हा एकदा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने 43 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. तो खेळत असेपर्यंत कांगारू विजयी मार्गावर होते. मात्र, 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला झेल बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकविला. कर्णधार मिचेल मार्शने 28 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 37, तर ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 20 धावा केल्या.