Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024 Ind vs Aus: 'टीम इंडियाने ते डोक्यात ठेवलं....'; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर शोएब अख्तरने केलं भरभरून कौतुक
T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर-8 च्या फेरीत काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या विजयात रोहित शर्मा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी सर्वात मोठे योगदान दिले. रोहितने 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये येऊन 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगने देखील भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट पटकावली.
भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.
2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतचा विजय जवळपास निश्चित होता. मात्र हा सामना भारताने गमावला आणि ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले. यावेळी टीम इंडियाने डोक्यातच ठेवलं होतं की यावेळी ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारचं...मग रोहित शर्माने हेच केलं जे त्याला करायला हवं.
रोहित शर्माने ज्या आक्रमकपद्धतीने फलंदाजी केली, मला वाटत होतं, तो आज 150 धावा करेल, असं कौतुक शोएब अख्तरने केलं. भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत बदला घेतल्याचंही शोएब अख्तर म्हणाला.
रोहित शर्मा काय म्हणाला?-ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, Satisfying...(समाधानकारक), रोहितचा हा शब्द ऐकून त्याने भारतीयांच्या मनातील गोष्ट बोलल्याचे सांगितले जात आहे. रोहित पुढे म्हणाला की, आम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून काय धोका उद्भवला जाऊ शकतो, हे जाणतो. एक संघ म्हणून आम्ही चांगले केले, आम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी करत राहिलो. एक संघ म्हणून आम्हाला चांगला आत्मविश्वास देतो. 200 ही चांगली धावसंख्या आहे. पण जेव्हा तुम्ही इथे खेळत असाल तेव्हा वारा हा एक मोठा घटक आहे. मात्र आम्ही चांगले खेळलो, असं रोहित शर्माने सांगितले.
उपांत्य फेरीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?-म्हाला काही वेगळे करायचे नाही. त्याच पद्धतीने खेळायचे आहे आणि प्रत्येकाला काय करायचे आहे ते समजून घ्यायचे आहे. मोकळेपणाने खेळा आणि पुढे काय आहे याचा जास्त विचार करू नका. विरोधी संघाचा विचार करू नका, आम्हाला ते करत राहावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीबद्दल रोहित म्हणाला, हा एक चांगला सामना असेल, एक संघ म्हणून आमच्यासाठी काहीही वेगळे होणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा डाव कसा राहिला?-भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड पुन्हा एकदा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने 43 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. तो खेळत असेपर्यंत कांगारू विजयी मार्गावर होते. मात्र, 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला झेल बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकविला. कर्णधार मिचेल मार्शने 28 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 37, तर ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 20 धावा केल्या.
टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार - हिटमॅन रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये मोठा माईलस्टोन पार केला. टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा पल्ला पार कऱणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 174 षटकारांची नोंद आहे.