एक्स्प्लोर
महाराष्ट्राचा पैलवान स्वप्निल शेलारची जॉर्जियात रौप्यकमाई

मुंबई : महाराष्ट्राचा युवा पैलवान स्वप्निल शेलारने जॉर्जियातल्या तिब्लिसी शहरात आयोजित जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली. 13 ते 18 सप्टेंबर
या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत स्वप्निल शेलारसह सौरभ इगवे आणि रोहन भोसले हे महाराष्ट्राचे पैलवानही सहभागी झाले होते. त्या तिघांपैकी स्वप्निलनं फ्रीस्टाईल कुस्तीच्या 46 किलो वजनी गटात फायनलमध्ये धडक मारली होती. पण रशियाच्या झगिर शकिएव्हकडून झालेल्या पराभवामुळं स्वप्निलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. स्वप्निल हा पुण्याच्या सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दरम्यान, फ्रीस्टाईल कुस्तीच्या 42 किलो वजनी गटात सौरभ इगवेला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाची चव चाखायला लागली. ग्रीको रोमच्या 42 किलो वजनी गटातही रोहन भोसलेचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं.
या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत स्वप्निल शेलारसह सौरभ इगवे आणि रोहन भोसले हे महाराष्ट्राचे पैलवानही सहभागी झाले होते. त्या तिघांपैकी स्वप्निलनं फ्रीस्टाईल कुस्तीच्या 46 किलो वजनी गटात फायनलमध्ये धडक मारली होती. पण रशियाच्या झगिर शकिएव्हकडून झालेल्या पराभवामुळं स्वप्निलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. स्वप्निल हा पुण्याच्या सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दरम्यान, फ्रीस्टाईल कुस्तीच्या 42 किलो वजनी गटात सौरभ इगवेला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाची चव चाखायला लागली. ग्रीको रोमच्या 42 किलो वजनी गटातही रोहन भोसलेचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. आणखी वाचा























