एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पात्रता लढतीतील जोरदार विजयासह सुशील कुमार जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात
ऑलिम्पिक पदकविजेता भारतीय पैलवान सुशील कुमारनं जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे.
नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेता भारतीय पैलवान सुशील कुमारनं जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. सुशील कुमारने नवी दिल्लीमध्ये झालेल्या पात्रता लढतीत 74 किलो वजनी गटात जितेंदर कुमारवर 4-2 अशी मात केली. त्यामुळे जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचं तिकीट पक्क झालं आहे.
कझाकिस्तानच्या नूर ए सुल्तानमधे 14 सप्टेंबरपासून वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेत पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सुशील कुमारचं पाऊल पडणार आहे.
Thank you everyone from the bottom of my heart for your support and blessings as I am now one step closer to my dream after winning the world championship trials today.. I am overwhelmed by the love that you bestow upon me..Just need your blessings and support always ???????????? pic.twitter.com/MO69FWHO6k
— Sushil Kumar (@WrestlerSushil) August 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement