एक्स्प्लोर
वेल लेफ्ट... स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची अनोखी शैली चर्चेत
स्मिथच्या या अनोख्या शैलीची दखल सोशल मीडियावरच्या अनेक नेटकऱ्यांनी घेत त्याला दाद दिली आहे. काहींनी तर विंडीजच्या कोर्टनी वॉल्शच्या स्टाईलशी स्मिथची तुलना केली आहे.
लॉर्ड्स : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत भन्नाट फॉर्ममध्ये आहे. पण याच मालिकेत स्मिथची फलंदाजीची आगळीवेगळी शैली क्रिकेटरसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
लॉर्डसच्या दुसऱ्या कसोटीत स्मिथनं अनेक वेळा चेंडू अनोख्या पद्धतीनं वेल लेफ्ट केला. चेंडू सोडताना स्मिथच्या या अनोख्या शैलीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय.
स्टीव्ह स्मिथनं क्रिकेटच्या परंपरागत शैलीला छेद देत फलंदाजीची एक वेगळी शैली निर्माण कैली आहे. तो फलंदाजी करताना एवढा शफल होतो की गोलंदाजी करताना गोलंदाजाला चेंडू कुठे टाकू आणि कुठे नको असं होतं. स्मिथच्या या अनोख्या शैलीची दखल सोशल मीडियावरच्या अनेक नेटकऱ्यांनी घेत त्याला दाद दिली आहे. काहींनी तर विंडीजच्या कोर्टनी वॉल्शच्या स्टाईलशी स्मिथची तुलना केली आहे. https://twitter.com/machanae1/status/1162346958125617152 दरम्यान स्मिथनं यंदाच्या अॅशेस मालिकेत आतापर्यंत तीन डावात दोन खणखणीत शतकं आणि एका शतकासह 234 धावांचा रतीब घातला आहे. त्याच्या झुंजार खेळीमुळे अॅशेस मालिकेतल्या पहिल्या एजबॅस्टन कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता. स्टीव्ह स्मिथची अॅशेस मालिकेतल्या मागील अकरा डावांतली कामगिरी : 143 नाबाद 141 40 6 236 76 नाबाद 102 83 144 142 92 डाव - 11 धावा - 1205 सरासरी - 133.88 100 - 6 50 - 3Steve Smith leaving the ball is the most entertaining thing I’ve seen in a long time 😂😂👏🏽 #Ashes pic.twitter.com/nuuyRrDpaJ
— Alexandra Hartley (@AlexHartley93) August 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement