एक्स्प्लोर
स्मिथची ‘विकेट’, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा साखरपुडा!

न्यूयॉर्क: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ट्विटरवर आयुष्यातील सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नुकताच साखरपुडा झाल्याची माहिती स्मिथनं ट्विटरवरुन दिली आहे.
स्मिथनं कायद्याचं शिक्षण घेत असलेली डेनी विलिस हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. त्यानं विलिससोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची एंगेजमेंट रिंगही दिसत आहे.
'आज मी गुडघ्यावर बसून तिला मागणी घातली आणि डेनीनं मला हो म्हटलं' असं ट्विट करत स्मिथनं हा फोटो शेअर केला आहे.
28 वर्षाच्या स्मिथनं न्यूयॉर्कमध्ये विलिससोबत साखरपुडा केला. मीडिया रिपोर्टनुसार, दोघंही मागील 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
