Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी, आणखी दोन स्टेंट लावल्या
सौरव गांगुली यांची Sourav Ganguly Health Update तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना दवाखान्यात भर्ती केलं आहे. एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे.
कोलकाता: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची (Sourav Ganguly Health Update) तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना दवाखान्यात भर्ती केलं आहे. एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर दुसऱ्यांदा अॅंजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे. याआधी 2 जानेवारी रोजी देखील हृदयाच्या तक्रारीमुळं अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ देवी शेट्टी यांनी गांगुलीच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर अॅंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की, 48 वर्षीय माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नसांमध्ये ब्लॉकेज आल्यामुळं दोन स्टेंट टाकण्यात आले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, संपूर्ण चाचण्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.
माहितीनुसार, सौरव गांगुली आपल्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, सौरव गांगुली रुग्णालयात पोहोचताच पुन्हा एकदा त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली होती
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. "गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी त्यावेळी सांगितलं होतं.