एक्स्प्लोर

स्लोआन स्टीफन्स : नवी ग्रँड स्लॅम चॅम्पियन

स्लोआन स्टीफन्सच्या कारकीर्दीतलं हे पहिलं-वहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. विशेष म्हणजे अमेरिकन ओपनच्या इतिहासात विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती गेल्या आठ वर्षांमधली पहिली बिगरमानांकित खेळाडू ठरली.

न्यूयॉर्क : अमेरिकेची बिगरमानांकित स्लोआन स्टीफन्स अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली आहे. स्लोआन स्टीफन्सने अमेरिकेच्याच मॅडिसन कीजचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडवून, महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. स्लोआन स्टीफन्सच्या कारकीर्दीतलं हे पहिलं-वहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. विशेष म्हणजे अमेरिकन ओपनच्या इतिहासात विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती गेल्या आठ वर्षांमधली पहिली बिगरमानांकित खेळाडू ठरली. याआधी 2009 साली किम क्लायस्टर्सनं अमेरिकन ओपन जिंकून, व्यावसायिक टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केलं होतं. स्लोआन स्टीफन्सनं यंदा बिगरमानांकित खेळाडू म्हणून अमेरिकन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवलाच, पण ग्रँड स्लॅमच्या इतिहासातही विजेतेपदाची मानकरी ठरलेली ती केवळ पाचवी बिगरमानांकित खेळाडू ठरली. स्लोआन स्टीफन्सच्या कामगिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिनं डाव्या तळपायाच्या दुखापतीतून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्याचा पराक्रम गाजवला. या दुखापतीमुळं स्लोआनला एक-दोन नाही, तर तब्बल 11 महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. त्या दुखापतीतून सावरलेल्या स्लोआननं जुलै महिन्यातच  व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यामुळं ती अमेरिकन ओपन जिंकेल, असं भाकित पंधरा दिवसांआधी कुणी केलं असतं तर लोकांनी त्यांना मूर्खात काढलं असतं. पण स्लोआननं कमाल केली. तिनं अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर केवळ आपलं नाव कोरलं नाही, तर महिला एकेरीच्या फायनलवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. स्लोआन स्टीफन्सच्या या यशाचं गमक तिच्या जन्मजात अॅथलेटिसिझ्मला आणि प्रामुख्यानं तिच्या आई सिबिल स्मिथना जातं. अमेरिकेचे व्यावसायिक फुटबॉलवीर जॉन स्टीफन्स आणि जलतरणपटू सिबिल स्मिथ यांची स्लोआन ही लेक. लहानपणापासूनच स्लोआनचा सांभाळ तिच्या आईनंच केला. कारण आधी जॉन स्टीफन्स यांचं अपघाती निधन झालं आणि मग त्यांचा दुसरा पतीही कर्करोगानं वारला. पण सिबिल स्मिथ यांनी आपल्या लेकीची आबाळ होऊ दिली नाही. त्यांनी स्लोआनला वयाच्या नवव्या वर्षीच टेनिसची गोडी लावली. स्लोआन  अकरा वर्षांची असताना त्यांनी तिला अॅकॅडमीत दाखल केलं होतं. आपल्या जन्मदात्रीच्या त्याच उपकारांची जाण ठेवून स्लोआननं त्यांना यशाचं श्रेय दिलं. स्लोआन स्टीफन्सनं वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवून आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली आहे. पण सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनींनी वयाची ओलांडलेली पस्तिशी लक्षात घेता स्लोआन स्टीफन्सकडून महिला टेनिसला आणखी मोठी अपेक्षा राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st ODI : वेस्ट इंडिजचा पार 'कचरा' केला! गिल-कोहलीचं वादळी शतक अन् कुलदीपचा असा डंका की कॅरिबियन बेटे पुरती हादरली, टीम इंडियाचा मोठा विजय
वेस्ट इंडिजचा पार 'कचरा' केला! गिल-कोहलीचं वादळी शतक अन् कुलदीपचा असा डंका की कॅरिबियन बेटे पुरती हादरली, टीम इंडियाचा मोठा विजय
IND vs WI 1st ODI Update : तिरुअनंतपुरममध्ये टीम इंडियाचा धुमाकूळ! वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून धुव्वा, मालिकेत 1-0 अशी आघाडी
तिरुअनंतपुरममध्ये टीम इंडियाचा धुमाकूळ! वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून धुव्वा, मालिकेत 1-0 अशी आघाडी
Virat Kohli Century IND vs WI 1st ODI : 'किंग' इज बॅक! तोच रूबाब, तोच थाट; विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले वादळी शतक, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे
'किंग' इज बॅक! तोच रूबाब, तोच थाट; विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले वादळी शतक, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे
SA vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेंबा बावुमा गरजला! ठोकले वादळी शतक अन् थेट MS धोनीची बरोबरी, विराट कोहलीचा विक्रम धोक्यात
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेंबा बावुमा गरजला! ठोकले वादळी शतक अन् थेट MS धोनीची बरोबरी, विराट कोहलीचा विक्रम धोक्यात

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Ahilyanagar Crime News: कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
Gold Silver Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
Vidyanand Bapat on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
Mumbai Crime News: विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
विश्वास नांगरे पाटलांची भीती दाखवली, ओळखपत्राचा फोटोही पाठवला, मुंबईतील व्यक्तीकडून 24.80 लाख मागितले अन्...
Ketan Agrawal Pune Lohagad Case : 'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई
मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Embed widget