Singapore Open 2022: भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं (PV Sindhu) शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा (Saena Kawakami) पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत (Singapore Open 2022 FinaL) धडक दिलीय. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणाऱ्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं 32 मिनिट सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव केला. 



उपांत्य फेरीत पीव्ही सिंधुचा एकहाती विजय
पीव्ही सिंधूनं चीनच्या हान युईचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूनं पहिला सेट गेम गमावल्यानंतर 17-21, 21-11, 21-19 असा विजय मिळवला होता. सिंधूसाठी उपांत्यपूर्व फेरीचा सामना जितका कठीण होता, तितकाच उपांत्य फेरीतील सामना सोपा होता.  तिनं कावाकामीचा अवघ्या 30 मिनिटांत कावाकामीचा पराभव केला.


विजेतेपदाच्या लढतीत कोणाशी सामना?
सिंगापूर ओपनच्या विजेतेपदाच्या लढतीत पीव्ही सिंधूचा सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग यांच्याशी होईल. जपानच्या अया ओहोरीनं उपांत्यपूर्व फेरीत भारतीय स्टार सायना नेहवालचा  21-13, 15-21, 22-10 असा पराभव केला होता. ओहोरीला आता विजेतेपदाच्या लढतीत सिंधूचा सामना करण्यासाठी जी यी वांगला पराभूत करावं लागेल.


पीव्ही सिंधूची चमकदार कामगिरी
पीव्ही सिंधू सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे. यावर्षी मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपननंतर तिनं प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. सिंधूनं स्विस विजेतेपदावर कब्जा केला होता. तिनं स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-16, 21-8 असा पराभव केला होता.


हे देखील वाचा-