Marathwada Rain Update: पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यात 687 घरांची पडझड झाली असून, विभागातील 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दीड महिन्यात मराठवाड्यात 381 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर यावेळी सुरवातीलाचा 90 मंडळात 1 वेळ अतिवृष्टी झाली असून, 52 मंडळात दोनदा, 26 मंडळात तीन वेळा, 11 मंडळात चार वेळा आणि 3 मंडळात पाचवेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच प्राथमिक अहवालानुसार मराठवाडा विभागात 687 घरांची पडझड झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती (आकडेवारी जून महिना ते आतापर्यंतची आहे)
अ.क्र. | जिल्हा | पाऊस | घरांची पडझड |
1 | औरंगाबाद | 271 मिलिमीटर | 18 |
2 | जालना | 330 मिलिमीटर | -- |
3 | बीड | 305 मिलिमीटर | 07 |
4 | लातूर | 348 मिलिमीटर | 35 |
5 | उस्मानाबाद | 283 मिलिमीटर | 29 |
6 | नांदेड | 588 मिलिमीटर | 453 |
7 | परभणी | 364 मिलिमीटर | 08 |
8 | हिंगोली | 475 मिलिमीटर | 132 |
आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण...
मराठवाड्यात आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, 48 लाख 57 हजार 152 पैकी 41 लाख 43 हजार 478 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 5 लाख 93 हजार हेक्टर, जालना 5 लाख 84 हजार हेक्टर, बीड 6 लाख 50 हजार, लातूर 4 लाख 28 हजार, उस्मानाबाद 4 लाख 3 हजार, नांदेड 6 लाख 95 हजार, परभणी 4 लाख 57 हजार तर हिंगोली जिल्ह्यात 3 लाख 30 हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.