CWG 2022, Sushila Devi : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये कमाल सुरु असतानाच आता ज्युदो खेळातही भारताने दोन पदकांना गवसणी घातली आहे. यामध्ये सुशीला देवी लिकमाबम (Shushila Devi) हीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या मायकेला व्हाइटबूईने तिला मात दिल्यामुळे सुशीलाचं सुवर्णपदक हुकलं. दुसरीकजे विजय कुमार याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे.
2014 साली पार पडलेल्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील सुशीला देवीने रौप्यपदक मिळवलं होतं. ज्यानंतर आताही इतिहासाची पुनरावृत्ती करत सुशीलाने बर्मिंगहम कॉमनवेल्थ खेळांमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. सुशीलाने अंतिम सामन्यात कडवी झुंज दिली. पण 4.25 मिनिटं चाललेल्या फायनलमध्ये अखेर सुशीलाला पराभव पत्करावा लागला.
मेहनतीच्या जोरावर सुशीलाने घडवला इतिहास
इम्फालमधील सामान्य कुटुंबातून आलेल्या सुशीलाने आज पदक मिळवत अवघ्या देशाचं नाव वर केलं आहे. सुशीलाचे वडीलही आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युदोपटू असल्याने तिच्या रक्तातच ज्युदो होतं. पण या खेळासाठी येणारा खर्च करताना एकेकाळी तिला कारही विकावी लागल्याचं समोर आलं होतं. पण सर्व अडचणींवर मात करत मेहनतीच्या जोरावर सुशीलाने इतिहास घडवला आहे.
भारताची पदकसंख्या आठवर
सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली आहे. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपम फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपगक भारताने निश्चित केलं आहे. या पदकासह भारताच्या खात्यावर नऊ पदकं झाली असून हे नववं पदक सुवर्ण असेल की रौप्य हे पाहावं लागेल.
हे देखील वाचा-