Boycott Laal Singh Chaddha On Twitter : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर या सिनेमावर नेटकऱ्यांकडून बहिष्कार टाकला जात आहे. सिनेमा रिलीज व्हायला दहा दिवस बाकी असताना या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. यासंदर्भात आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या करीना कपूरने (Kareena Kapoor) भाष्य केलं आहे. 


लाल सिंह चड्ढासंदर्भात करीना म्हणाली...


इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत करीनाने 'लाल सिंह चड्ढा' सिनेमावर बहिष्कार टाकण्यात येत असलेल्या गोष्टीवर भाष्य केलं आहे. करीनाने म्हटलं आहे, 'लाल सिंह चड्ढा' सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मोहिम राबवली जात आहे. सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तिला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. जगातील प्रत्येकाची आवड-निवड वेगळी आहे. एखादी गोष्ट एखाद्याला आवडते. तर दुसऱ्याला ती आवडत नाही".


करीना पुढे म्हणाली,"मी सोशल मीडियावर माझ्या आवडीच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आमचा सिनेमा चांगला असेल तर बहिष्कार घालणारे काय करतील? सिनेमा चांगला असेल तर तो येणाऱ्या अडचणींचा सामना करत चांगले यश कमावतो. बहिष्काराकडे दुर्लक्ष करत आता पुढे जायला हवं"


'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार का टाकला जात आहे? 


'लाल सिंह चड्ढा'मध्ये आमिरने 'फॉरेस्ट गंप'ची कॉपी केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. तर दुसरीकडे आमिरने भारतीय संस्कृतीच्या विरोधात अनेक विधाने केली आहेत. त्यामुळेच त्याच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. करीना तिचे सिनेमे स्वत: पाहत नाही आणि इतरांना पाहण्याचा सल्ला देते अशा अनेक कारणांनी 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमावर बहिष्कार घालण्यात येत आहे. 


'लाल सिंह चड्ढा' 11 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आमिर खान आणि करीना कपूर याआधी '3 इडियट्स' या सिनेमात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


#BoycottLaalSinghChaddha ट्रेडिंगमध्ये; आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार घालण्याची नेटकऱ्यांची मागणी


Movies Release on August : ऑगस्टमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'लाल सिंह चड्ढा'पासून 'दे धक्का 2'पर्यंत बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित