Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेतील सामने अगदी चुरशीचे सुरु आहेत. भारतही दमदार कामगिरी करत आहे. पण या सर्वामध्येच कॉमनवेल्थ संबधित आणखी एक गोष्ट चर्चेत आली आहे. ती म्हणजे कॉमनवेल्थ स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी खाद्यपदार्थांची अव्वच्या सव्वा असणारी किंमत. एका नेटकऱ्याने एका सॉसेजसह फ्रेंच फ्राईसची किंमत जवळपास 10 पाऊंड म्हणजे 1000 भारतीय रुपये इतकी असल्याची पोस्ट केली होती. ज्यानंतर मीडियासह सर्व नेटकऱ्यांनी ही पोस्ट व्हायरल करत संतापही व्यक्त केला आहे.


इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात 28 जुलै ते 8 ऑगस्टमघ्ये कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) ही स्पर्धा पार पडत आहे. अशामध्ये या भव्य स्पर्धेचं संपूर्ण आयोजन इंग्लंडमध्ये झालं आहे. जगभरातील विविध देशातून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंघहममध्ये आले आहेत. खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकही विदेशातून याठिकाणी आले आहेत. अशामध्ये या ठिकाणी गोष्टींची किंम अधिक असण्याची शक्यता आहे. पण बाहेरच्या किंमतीपेक्षा तीन पटीने किंमत असल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.


'ही तर चोरी आहे'


सर्वात आधी मॅथ्यू विल्यम्स (Mathew Williams) या युजरने या फ्रेंच फ्राईज आणि सॉसेजचा फोटो पोस्ट करत त्याची किंमत सांगितली. त्याने उपहासात्मकपणे या फ्राईज आणि सॉसेजची क्वॉलीटी अप्रतिम असल्याचंही सांगितलं. ज्यानंतर नेटकऱ्यांनी देखील आपला संताप व्यक्त करत विविध कमेंट्स केल्या. यात एकाने लिहिले की, 'काय अप्रतिम आहे यात, सर्वात महाग सॉसेज असण्याचा पुरस्कार मिळाला आहे का?', दुसऱ्याने लिहिले 'ही तर चोरी आहे.' तर एक जण म्हणतो 'हे फ्राईज नसून सफरचंदाच्या फोडी वाटत आहेत.' अशाप्रकारे नेटकरी संताप व्यक्त करत आहे. दरम्यान भारतात 2010 साली झालेल्या कॉमनवेल्थ खेळांदरम्यान मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर आता इंग्लंडमध्ये या खेळांदरम्यानही प्रेक्षकांची एकप्रकारे लूट होत असल्याचं दिसून येत आहे. 






 


हे देखील वाचा-