Hussamuddin Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत (Commonwealth Weightlifting Games 2022) भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करत असून आता बॉक्सर्सनी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. भारताचा बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन (Mohammed Hussamuddin) याने बांग्लादेशच्या सलीमला मात देत उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री मिळवली आहे. त्याआधी काही वेळापूर्वी बॉक्सर अमित पंघालनं (Amit Panghal) वनुआटूच्या नामारी बेरीचा (Namari Berry) पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री केली. 


बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन याने बांग्लादेशचा बॉक्सर सलीम याच्याविरुद्धचा सामना अगदी एकहाती जिंकला. सुरुवातीपासून दमदार फॉर्म दाखवत त्याने सामना 5-0 च्या फरकाने आपल्या नावे केला. हुसामुद्दीन हा पुरुषांच्या 54-57 किलो वजनी गटात खेळत होता. हा या स्पर्धेतील राऊंड ऑफ 16 होता. जो जिंकल्यामुळे आता तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. 


अमित पंघालचं दमदार प्रदर्शन 
अमितनं सामन्याची शानदार सुरुवात केली आणि तीन्ही फेऱ्यांमध्ये 10-10 गुण मिळवले. बेरीनं पहिल्या फेरीत नऊ गुण मिळवले होते. पण पुढच्या दोन फेरीत तो आठ गुणांच्या पुढे जाऊ शकला नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अमितविरुद्ध तो संघर्ष करताना दिसला. तसेच अमितनंही त्याला सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. 


बॉक्सर निकहत झरीनही उपांत्यपूर्व फेरीत
निकहत झरीनं महिलांच्या लाइटवेट प्रकारात मोझांबिकच्या हेलेना इस्माईल बागाओचा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत निकहत झरीनचा सामना न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनशी सामना होईल. हेलेना इस्माईल बागाओला पराभूत केल्यानंतर निकहत झरीन म्हणाली की, "पहिला सामना जिंकल्याचा मला आनंद आहे आणि पुढच्या फेरीत चांगली कामगिरी करण्यासाठी मी तयार आहे. मी पदकापासून फक्त एक सामना दूर आहे पण मी येथे सुवर्ण जिंकण्यासाठी उत्सुक आहे."


 हे देखील वाचा-