एक्स्प्लोर
शाहिद अफ्रिदी आणि जावेद मियाँदादची आपापसातच चिखलफेक
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 10 Oct 2016 01:44 PM (IST)
1/7

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले. या घटनेनंतर हडबडलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनीही भारतावर टीकेची झोड उठवली.
2/7

मियाँदाद अफ्रिदीच्या पैशांच्या वक्तव्यावरुन प्रचंड संतप्त झाला. त्याने, ''हे सगळे चोर आहेत. यांची मार्केट व्हॅल्यू कमी झाल्याने मीडियामध्ये येऊन वक्तव्ये देत सुटलेत. अफ्रिदीने देशाचा विश्वासघातक केला आहे. याच्या भावाला विचारा मी याला जबरदस्तीने कसोटी क्रिकेटमध्ये खेळू दिले. नाहीतर याला टीममध्ये घेण्यासही कोणी उत्सुक नव्हते.'' असेही मियाँदाद यावेळी म्हणाला.
3/7

'' अफ्रिदीने देशाला विकले की नाही, हे सांगण्यासाठी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन याची शपथ घ्यावी,'' असे आव्हान मियाँदादने अफ्रिदीला दिले. ''मी त्याला अनेकवेळा चोरी करताना पकडलं आहे. त्याने अनेक सामने गमावले. मी त्याला देशाचा विश्वासघात करताना रंगेहाथ पकडलं होतं. जर माझ्या हातात असते तर मी त्याला पुन्हा पाकिस्तानकडून खेळण्याची संधी कधीही दिली नसती.'' असा आरोप केला.
4/7

मियाँदाद पुढे म्हणाला कि, ''अफ्रिदी आता मोठ्या बाता मारत आहे. पण त्याने माझी कृपा राहावी, यासाठी मला वारंवार फोन केला, तसेच इतरांकडून मेसेजही केले.''
5/7

अफ्रिदीने एका पत्रकार परिषदेत मियाँदादवरील सर्व भडास काढताना, ''मियाँदाद नेहमीच पैशांसाठी भुकेलेला आहे.'' अशी प्रतिक्रिया दिली.
6/7

पण आता पाकिस्तानचे सेलिब्रिटी सैरभैर झाले आहेत. कारण शाहिद अफ्रिदी आणि जावेद मियाँदाद या दोन माजी दिग्गज क्रिकेटपटूंमध्येच चिखलफेक सुरु आहे.
7/7

यावर मियाँदादनेही अफ्रिदीचे वाभाडे काढले. अफ्रिदी पैशांसाठी देशालाही विकू शकतो, असे मियाँदाद म्हणाला.
Published at : 10 Oct 2016 01:44 PM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
क्रीडा
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
क्रीडा
शेवटच्या 14 मिनिटांत 3 गोल! फुटबॉल इतिहासातील भारी मॅच; मेस्सीच्या अर्जेंटिनाने इजिप्तच्या जबड्यातून विजय हिसकावला, क्वार्टर फायनलमध्ये धडक
क्रीडा
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?






















