IND vs NZ 5th ODI : पैसे मोजले, सबस्क्रिप्शन घेतलं, पण भारत-न्यूझीलंडचा सामना पाहताच येईना! SonyLIV कडून पाचव्या सामन्यात मोठी चूक, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 5th ODI Sonyliv Streaming Issue : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे.

IND vs NZ 5th ODI Sonyliv Streaming Issue : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. अवघ्या 34 धावांवर भारताने आपल्या आघाडीच्या तीन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहेत. रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या तिन्ही अनुभवी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. यासगळ्या दरम्यान, सोनीलिव्हवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामना पाहताना वारंवार बफरिंग होणे, अचानक स्क्रीन काळी पडणे आणि प्रक्षेपण बंद होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत. विशेष म्हणजे, पैसे भरून सबस्क्रिप्शन घेतल्यानंतरही अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
@SonySportsNetwk @SonyLIV we are not paying for a subscription to watch this and just the advertisement you keep on showing please show some cricket too really fed up by this broadcast https://t.co/g9SKMbcKt5
— Priyank Turakhia (@yanks666) November 15, 2026
सामन्यादरम्यान वारंवार प्रक्षेपण बंद
सोशल मीडियावर एका क्रिकेट चाहत्याने सोनीलिव्हच्या सेवेवर प्रश्न उपस्थित केले. भारत-न्यूझीलंड पाचव्या वनडे सामन्यादरम्यान दर 20 ते 25 मिनिटांनी बफरिंग होत असून त्यानंतर संपूर्ण प्रक्षेपण बंद पडत असल्याचे त्याने म्हटले. फक्त लाइव्ह क्रिकेटच नव्हे, तर चित्रपट पाहतानाही अशाच अडचणी येत असल्याचा दावा त्याने केला. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र कोणत्याही अडचणीशिवाय कंटेंट पाहता येत असल्याचेही त्याने नमूद केले.
@SonyLIV still hasn't got its act together. Every 20-25 minutes there's buffering and then total blackout. Movies or live cast, both fail. Other platforms are smooth as silk. Sad! https://t.co/fHG7DDI3xN
— Balakrishnan Unny (@balanandbala) November 15, 2026
पैसे भरूनही जाहिरातींचा मारा!
दुसऱ्या एका युजरने सबस्क्रिप्शन घेऊनही जाहिराती दाखवल्या जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सामन्यातील प्रत्येक षटकादरम्यान, तर कधी अचानक सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी जाहिराती दाखवल्या जात असल्याची तक्रार त्याने केली. क्रिकेट पाहण्यासाठी पैसे भरले आहेत की जाहिराती पाहण्यासाठी, असा सवालही त्याने उपस्थित केला.
SonyLIV कडून तांत्रिक अडचणीची कबुली
दरम्यान, सोनीलिव्हच्या प्रसारणादरम्यान स्क्रीनवर तांत्रिक अडचणीबाबत संदेशही झळकला. 'सोर्स' स्तरावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे प्रक्षेपण खंडित झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही संदेशात सांगण्यात आले. त्यामुळे भारत-न्यूझीलंड सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्क्रीनसमोर बसलेल्या क्रिकेट चाहत्यांना मात्र तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
सामन्यात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. अवघ्या 37 धावांवर भारताने तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 बाद 37 अशी आहे. भारताला सहाव्या षटकात 23 धावांवर पहिला धक्का बसला. जेकब फिशरने रोहित शर्माला फॉक्सक्रॉफ्टकरवी झेलबाद केले. रोहितला केवळ 7 धावा करता आल्या. त्यानंतर आठव्या षटकात फिशरने विराट कोहलीला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. कोहली अवघ्या 5 धावा करून माघारी परतला. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 33 अशी झाली. यानंतर नवव्या षटकात जेकब डफीने ऋतुराज गायकवाडला सेफर्टकरवी झेलबाद केले. ऋतुराजला केवळ 18 धावा करता आल्या. अवघ्या 34 धावांवर भारताने तिसरी विकेट गमावली. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजीचा डाव सुरुवातीलाच अडचणीत सापडला आहे.
हे ही वाचा -




















