एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठमोळ्या संजीवनी जाधवला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक
वीस वर्षांच्या संजीवनी जाधवचं हे दुसरं मोठं यश ठरलं आहे. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे.
नाशिक : नाशिकच्या संजीवनी जाधवनं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तैपेई सिटीत आयोजित या स्पर्धेत संजीवनीनं दहा हजार मीटर्स शर्यतीचं रौप्यपदक जिंकलं. नाशिकच्या संजीवनी जाधव या मराठमोळ्या धावपटूनं दोन महिन्यांमध्ये दोन पदकं मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
वीस वर्षांच्या संजीवनीचं हे दुसरं मोठं यश ठरलं. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे.
संजीवनी ही मूळची पैलवान आहे. पण नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी तिला अॅथलेटिक्सकडे वळवलं आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement