Sanket Sargar: कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगरच्या कुटूंबाला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन कडून एक लाखाची मदत जाहीर केलीय. तसेच काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखाची मदतीची घोषणा केलीय. या अकॅडमीत संकेत सराव करत असे.
विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखांची मदत
सांगली येथील संकेत सरगरच्या सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातील घरी विश्वजीत कदम यांनी भेट दिली.यावेळी संकेत सरगरचे प्रशिक्षक मयूर सिंहासनं देखील उपस्थित होते. यावेळी संकेत सरगरच्या आई-वडिलांसह त्याची वेटलिफ्टर बहीण काजल सरगरच्याही कामगिरीचं कौतुक केलं. तसेच दिग्विजय अकॅडमी मधून पुढचा संकेत देखील घडावा, अशी अपेशा व्यक्त करत या अकॅडमीला पाच लाखांची मदत जाहीर केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून तीस लाखांची मदत
कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 वेटलिफ्टिंग खेळातील 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील सांगलीकर संकेत सरगर ला राज्य सरकारच्या वतीने 30 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर. तसेच संकेतला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना 7.5 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे रविवारी केली.
कॉमनवेल्थ स्पर्धेत संकेत सरगरची धडाकेबाज कामगिरी
बर्मिघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत संकेत सरगरनं रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचं खातं उघडलं. सरगरनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलो ग्राम वजन गटात 248 किलो ग्राम वजन उचलत बर्मिंगहॅम येथे देशाचा झेंडा फडकावला. संकेतने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात 113 किलोग्राम वजन उचललं. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये 135 असं एकूण 148 किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र, दुसऱ्या फेरीदरम्यान संकेत जखमी झाल्यानं त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
हे देखील वाचा-