CWG 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. भारताच्या क्रिकेट, हॉकी संघानं आपपले सामने जिंकूले. तर, भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं (Srihari Nataraj) 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनमध्ये (50m Backstroke Final) जागा निश्चित केलीय. त्याच्याकडं 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनलमध्ये विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. यामुळं संपूर्ण भारतीयांच्या नजरा लक्ष श्रीहरी नटराजच्या कामगिरीवर असणार आहेत.

25.38 सेंकदाची वेळ नोंदवून फायनलमध्ये धडकश्रीहरी नटराजने  50 मीटर बॅकस्ट्रोकच्या उपांत्य फेरीत 25.38 सेंकदाची वेळ नोंदवून फायनलमध्ये धडक दिली. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्यानं  25.52 सेकंदाची वेळ नोंदवून उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती. श्रीहरी नटराज त्याच्या हीटमध्ये दुसऱ्या आणि एकूण आठव्या स्थानावर राहिला. पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत श्रीहरी नटराजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 24.40 सेकंद आहे. त्यानं गेल्या वर्षी यूएईमध्ये या विक्रमाला गवसणी घातली होती.

क्रिकेट सामन्यात भारतानं पाकिस्तानला नमवलंभारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 9 विकेट्सनं पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. 

भारतीय हॉकी संघाची दणक्यात सुरुवातबर्मिंगहॅम कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं त्यांच्या गटातील पहिल्याच सामन्यात सामन्यात घानाचा 11-0 असा पराभव केलाय. या सामन्यात भारतासाठी आठ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंह सर्वाधिक तीन गोल केले. हा भारतीय कर्णधार मनप्रीत सिंहचा 300 वा आणि हरमनप्रीत सिंहचा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.

हे देखील वाचा-