CWG 2022 Live Updates Day 4: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स

Birmingham Commonwealth Games 2022 Live Updates: भारतीय बॉक्सर अमित पंघल आज 2022 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील त्याचा पहिला सामना खेळणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Aug 2022 01:22 AM
CWG 2022 Live Updates Day 4: भारताच्या हरजिंदरनं कोरलं कांस्य पदकावर नाव

भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने (Harjinder Kaur) कांस्य पदक खिशात घातलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 71 किलो वजनी गटात हरजिंदरनं ही कामगिरी केली आहे.

CWG 2022 Live Updates Day 4: भारताचं आणकी एक पदक निश्चित

बॅडमिंटन खेळात भारतीय संघ सेमीफायनलचा सामना सिंगापूर विरुद्ध खेळत असून पहिला सामना पुरुष दुहेरीचा जिंकल्यानंतर सिंधूनेही सिंगापूरच्या जिया मिन यू ला 21-11 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला. ज्यानंतर लक्ष्य सेनने विजय मिळवत सामन्यात भारत 3-0 ने विजयी आघाडीवर आहे. आता भारत फायनलमध्ये पोहोचल्याने आणखी एक पदक निश्चित झालं आहे. 

CWG 2022 Live Updates Day 4: पीव्ही सिंधूचा दमदार विजय, भारत पदकाजवळ

बॅडमिंटन खेळात भारतीय संघ सेमीफायनलचा सामना सिंगापूर विरुद्ध खेळत असून पहिला सामना पुरुष दुहेरीचा जिंकल्यानंतर सिंधूनेही सिंगापूरच्या जिया मिन यू ला 21-11 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला. ज्यामुळे केवळ एका विजयासह भारताचं आणखी एक पदक निश्चित होईल.

CWG 2022 Live Updates Day 4: विजयकुमारला ज्युदोमध्ये कांस्यपदक

सुशीला देवीने रौप्यपदक मिळवलं असताना दुसरीकडे पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात विजय कुमारने कांस्य पदक मिळवलं आहे.

CWG 2022 Live Updates Day 4: भारत-इंग्लंड सामना अनिर्णीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हॉकी सामना 4-4 गोल स्कोरमुळे अनिर्णीत राहिला आहे.

CWG 2022 Live Updates Day 4: सुशीला देवीने रचला इतिहास, ज्युदोमध्ये रौप्यपदक

भारताच्या सुशीला देवी हीने ऐतिहासिक कामगिरी करत कॉमनवेल्थ खेळात भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. 48 किलो गटात तिने ही कामगिरी केली.

CWG 2022 Live Updates Day 4: सामन्यात चुरस, पण भारत आघाडीवर

इंग्लंडनेही दोन गोल केले असले तरी भारताने आणखी एक गोल करत आघाडी 4-2 केली आहे.

CWG 2022 Live Updates Day 4: भारतीय संघ आघाडीवर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज पुन्हा भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला असून इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आहे. सामन्यात भारताने सुरुवातीलाच 3 गोल करत 3-0 ची आघाडी घेतली आहे.

CWG 2022 Live Updates Day 4: भारत विरुद्ध इंग्लंड हॉकी सामना सुरु

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज पुन्हा भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला असून इंग्लंडविरुद्ध सामना खेळत आहे. 

 लॉन्स बाऊल्समध्ये भारताचं रौप्यपदक निश्चित

लॉन्स बाऊल्समध्ये भारताचं रौप्यपदक निश्चित झालंय. उपांत्यफेरीत भारतानं न्यूझीलंडचा 16-13 असा पराभव केलाय. आता पदक जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. 


 

CWG 2022 Live Updates Day 4: भारताचा वेटलिफ्टर अजय सिंह अपयशी

भारताचा वेटलिफ्टर अजय सिंगला 81 किलो वजनी गटात पदक जिंकता आले नाही. स्नॅच राऊंडमध्ये 143 किलो वजन उचलल्यानंतर त्याला क्लीन अँड जर्कमध्ये 176 किलो वजन उचलण्यात यश आलं. मात्र, पदकासाठी त्याचं प्रयत्न अपुरे ठरले. तो 319 किलो वजनासह चौथ्या स्थानावर राहिला.


 


 

CWG 2022 Live Updates Day 4: स्नॅच फेरीनंतर अजय सिंह दुसऱ्या स्थानावर

वेटलिफ्टिंगच्या 81 किलो स्नॅच फेरीत इंग्लंडचा ख्रिस मरे सध्या 144 किलो वजनासह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा अजय सिंह आणि ऑस्ट्रेलियाचा काईल ब्रुस 143-143 किलो वजनासह सयुंक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, कॅनडाचा निकोलस 140 किलो वजनासह तिसऱ्या स्थानावर आहे.

CWG 2022 Live Updates Day 4: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉन्स बॉऊल्स सामना सुरू

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉन्स बॉऊल्स सामन्याला सुरुवात झालीय. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी आणि रूपा राणी महिलांच्या चार उपांत्य फेरीत भारताकडून खेळत आहेत. 

CWG 2022 Live Updates Day 4: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी दोन पदक मिळण्याची शक्यता

CWG 2022 Live Updates Day 4:  कॉमनवेल्थ स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दोन पदके मिळू शकतात.  वेटलिफ्टिंगच्या 81 किलो ग्राम वजन गटात अजय सिंह आणि वेटलिफ्टिंग महिला 71 किलो वजन गटात हरजिंदर कौर आपलं नशीब आजमावतील. याशिवाय बॉक्सिंग आणि पुरुष हॉकी संघातील अमित पंघालच्या सामन्यांवरही सर्वांच्या नजरा असतील. पुरुष हॉकी संघ इंग्लंडविरुद्ध आहे. टेबल टेनिसमध्ये पुरुष संघ उपांत्य फेरीत नायजेरियाशी भिडणार आहे.

पार्श्वभूमी

Birmingham Commonwealth Games 2022 Live Updates: भारतीय बॉक्सर अमित पंघल आज 2022 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील त्याचा पहिला सामना खेळणार आहे. पुरुष बॅडमिंटन आणि टेबल टेनिस संघ सोमवारी बर्मिंगहॅम येथे उपांत्य फेरीत खेळतील. गोल्ड कोस्ट 2018 रौप्यपदक विजेता अमित पंघल त्याच्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 च्या मोहिमेची सुरुवात पुरुषांच्या फ्लायवेट फेरी 16 मध्ये वानुआतुच्या नामरी बेरीविरुद्ध करेल.


बॅडमिंटन मिश्र संघाला उपांत्य फेरीत जगज्जेता लोह कीन य्यूच्या नेतृत्वाखालील सिंगापूरचे कडवे आव्हान असेल. गतविजेता पुरुष टेबल टेनिस संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल. त्यांचा सामना नायजेरियाशी होईल. तर, काल घानाविरुद्ध मोठा विजय मिळवणारा भारतीय पुरूष हॉकी संघ आपला दुसरा पूल सामना खेळणार आहे. तसेच भारतीय जिम्नॅस्टिक्स प्रणती नायक बर्मिंगहॅम 2022 मध्ये महिला व्हॉल्ट फायनलमध्ये भाग घेणार आहे.


कॉमनवेल्थ 2022 पदक तालिका-
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 22 सुवर्णपदकासह एकूण 52 पदकं जिंकली आहेत. तर, 11 सुवर्णपदकासह एकूण 34 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यंत 10 सुवर्णपदकासह एकूण 19 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका( 4 सुवर्ण, एकूण 6 पदक), पाचव्या क्रमांकावर कॅनडा (3 सुवर्ण, एकूण 18 पदक), सहाव्या क्रमांकावर भारत (3 सुवर्ण पदक, एकूण 6 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलँड (2 सुवर्ण, एकूण 17 पदक), आठव्या क्रमांकावर मलेशिया (2 सुवर्ण, एकूण 4 पदक), नवव्या क्रमांकावर नजेरिया (2 सुवर्ण, एकूण 3 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर वॉल्स (1 सुवर्ण, एकूण 9 पदक). 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.