Rohan Bopanna Win Australian Open : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्नाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकलाय. बोपन्नाने शनिवारी (दि.27) साथीदार मॅथ्यू एबडनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या अंतिम फेरीत विजय मिळवला. 43 वर्षीय बोपन्नाने मॅथ्यू एबडनच्या साथीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि एंड्रिया वावस्सोरी यांना 7-6 आणि 7-5 च्या फरकाने धूळ चारली. या विजयासह रोहन बोपन्नाने इतिहास रचलाय. हा बोपन्नाच्या कारकिर्दीतील पहिला दुहेरी ग्रँड स्लॅमचा किताब आहे. त्याने एकूण दोन ग्रँड स्लॅमच्या किताबावर नाव कोरले आहे. यापूर्वी 2017 मध्ये डॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्रित दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकला होता. 


रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरलाय. सोबतच तो चॅम्पियन बनणारा वयस्कर खेळाडू आहे. त्याने जीन ज्युलियन रोजरचा विक्रम मोडित काढलाय. नेदरलँडच्या जीनने 40 वर्षे आणि 9 महिने एवढे वय असताना फ्रेंच ओपनचा दुहेरी किताब जिंकला होता. बोपन्नाने अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतर मॅथ्यू एडबनचे कौतुक केले आहे. तो ग्रँड स्लॅम जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय. बोपन्ना यावेळी म्हणाला, "मी 43 व्या लेवलचा आहे, 43 वर्षांचा नाही. हे माझ्या ऑस्ट्रेलियन साथीदाराशिवाय शक्य नव्हते." बोपन्ना यापूर्वी 2013 आणि 2023 अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम  फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. 


ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकावणारे भारतीय 


2003 - लिएंडर पेस आणि मार्टिना नवरातिलोआ (अमेरिका)


2006- महेश भूपती आणि मार्टिना हिंगिस (स्वित्झरलँड)


 2009- महेश भूपती आणि सानिया मिर्झा 


2010- लिएंडर पेस आणि कारा ब्लॅक (झिम्बाब्वे)


2012- लिएंडर पेस आणि राडेक स्टेपनेक (चेकिया)


2015- लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस (स्वित्झरलँड)


2016- सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस (स्वित्झरलँड)


2024- रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन (ऑस्ट्रेलिया)


 










इतर महत्वाच्या बातम्या


190 धावांच्या पिछाडीनंतर भारतावर 126 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात इंग्लंडचा धमाका, पोपचं धडाकेबाज शतक!