IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवशी ओली पॉप दमदार शतकी खेळी करत इंग्लंडच्या संघाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली आहे. दुसऱ्या डाव्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर 316 धावा केल्या असून 6 विकेट्स गमावल्या आहेत. सामन्याचे आणखी दोन दिवस उरले आहेत. ओली पॉपच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडकडे आता 126 धावांची आघाडी आहे.


ओली पोपची दमदार शतकी खेळी


इंग्लंडचा टॉप ऑर्डर फलंदाज ओली पॉप याने 208 चेंडूमध्ये नाबाद 148 धावांची खेळी केली आहे. त्याने 17 चौकारांच्या सहाय्याने ही शतकी खेळी केली. ओली पॉप शिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. इंग्लंडकडून, बेन डकेट 52 चेंडूमध्ये 47, झॅक क्रॅवले 33 चेंडूमध्ये 31, ब्रेन फोक्स 81 चेंडूमध्ये 34 तर रेहान अहमदने नाबाद राहत 16 धावांचे योगदान दिले. 


चौथ्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष


भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ भारतासमोर किती धावांचे आव्हान देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. इंग्लंडचा संघाने उद्या मोठी धावसंख्या उभी केली तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. ओली पॉपच्या शतकी खेळीने आजचा दिवस इंग्लंडने आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे उद्या इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद करत आव्हानाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 


दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यात 175 धावांची आघाडी घेत सामन्यावरिल पकड मजबूत केली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी भारताला केवळ 15 धावाच करता आल्या. भारताची तब्बल 190 धावांची आघाडी इंग्लंडच्या संघाने मोडून काढली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी 2 तर अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 1 विकेट पटकावली आहे. 










इतर महत्वाच्या बातम्या 


IND vs ENG 1st Test: याची बॅट जणू तळपती तलवार, यानं टाकलेला बॉल तर तोफगोळाच; प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवतो टीम इंडियाचा 'सर' जाडेजा