एक्स्प्लोर
रॉजर फेडररची ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक
कॅनबेरा: स्वित्झर्लंडचा माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेल्या फेडररनं उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या मिशा झ्वेरेव्हवर सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.
फेडररनं हा सामना 6-1, 7-5, 6-2 असा जिंकला आणि कारकीर्दीत तेराव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठली. 36 वर्षीय फेडररला आता त्याच्याच देशाच्या म्हणजे स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वावरिंकाचा मुकाबला करायचा आहे.
चौथ्या मानांकित वावरिंकानं फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाचं आव्हान 7-6, 6-4, 6-3 असं मोडीत काढलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement