एक्स्प्लोर

'या' भारतीय गोलंदाजाने दशकात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या

एका भारतीय गोलंदाजाने गेल्या दोन वर्षांपासून एकही वन डे आणि टी-20 सामना न खेळता संपूर्ण दशकात सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा बहुमान मिळवला

मुंबई : भारताचा स्टार ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन याने गेल्या दोन वर्षांपासून एकही एकदिवसीय आणि एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तरीदेखील त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. अश्विनने या संपूर्ण दशकात (1 जानेवारी 2010 ते आतापर्यंत) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत. मागील 10 वर्षांमध्ये अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदविसीय आणि टी-20) मिळून तब्बल 564 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यामागोमाग इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याचा क्रमांक लागतो. अँडरसनने या दशकात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 535 विकेट्स मिळवल्या आहेत. अश्विन आणि अँडरसनमध्ये 29 विकेट्सचा फरक आहे. ही आकडेवारी अश्विनला तो एक प्रतिभाशाली गोलंदाज असल्याचे सिद्ध करते. विशेष म्हणजे अश्विनने 9 जूलै 2017 नंतर भारतासाठी एकही एकदिवसीय तसेच टी-20 सामना खेळलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो केवळ कसोटी सामने खेळतोय. अश्विनने 30 जून रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तर 9 जूलै 2017 रोजी त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला होता. 1 जानेवारी 2010 ते आतापर्यंत अश्विन 70 कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 362 विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्या भारतीय गोलंदाजासाठी ही खूप सर्वात मोठी आकडेवारी आहे. तर अश्विनने याच कालावधीत 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामध्ये त्याने 150 विकेट्स मिळवल्या आहेत. या आकडेवारीनंतर भारताच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूंच्या यादीत अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्यानंतर आता अश्विनचाच नंबर लागतो. दशकात सर्वाधिक विकेट्स मिळवणारे गोलंदाज
गोलंदाज संघ सामने विकेट्स
रवीचंद्रन अश्विन भारत 227 564
जेम्स अँडरसन इंग्लंड 179 535
स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड 212 525

महत्त्वाच्या बातम्या

IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs IRE 2nd T20 : भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात
भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात
IND vs IRE 2nd T20 : टीम इंडियाचा दुसऱ्या टी-20 सामन्यात 1 धावेने पराभव, आयर्लंडने 2-0 ने जिंकली मालिका
IND vs IRE 2nd T20 : टीम इंडियाचा दुसऱ्या टी-20 सामन्यात 1 धावेने पराभव, आयर्लंडने 2-0 ने जिंकली मालिका
Ben Stokes Retirement : एकच बातमी अन् अख्खं क्रिकेट विश्व हादरलं! LIVE मॅचमध्ये बेन स्टोक्सची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा; इंग्लंडमध्ये नेमकं काय घडलं?
एकच बातमी अन् अख्खं क्रिकेट विश्व हादरलं! LIVE मॅचमध्ये बेन स्टोक्सची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा; इंग्लंडमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget