एक्स्प्लोर

Rishabh Pant : ऋषभ पंतचे घर रेल्वेच्या निशाण्यावर! जाणून घ्या नेमका काय प्रकार आहे

Rishabh Pant : रेल्वेने ऋषभ पंतच्या घराबाहे खांब उभारले आहेत. पंतच्या घरासमोर खांब बसवणाऱ्या अधिकाऱ्यांना काही लोकांनी विरोध देखील केलाय.

Rishabh Pant : उत्तराखंडमधील रुरकीमध्ये रेल्वे आपली जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहे. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने आपली जमिनी वाचवण्यासाठी लोकांच्या घराबाहेर खांब उभा केले आहेत. यात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) घराचा देखील समावेश आहे. रेल्वेने ऋषभ पंतच्या घराबाहेर देखील खांब उभारले आहेत.   

गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केल्याचे सांगितले जात आहे. रुरकीच्या धांधेरामध्ये चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. आपली हद्द लक्षात येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खांब उभा केले आहेत. परंतु, हे खांब उभारल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना अडचणी येत आहेत. स्थानिक लोकांनी घराच्या फोटोंस  ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अनेकांनी ऋषभच्या घरासमोरील खांबाचे फोटो ट्विट केले आहेत. सरकार आपल्या देशातील खेळाडूंचा असाच आदर करते का? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. नेटकऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग करून प्रश्न विचारले आहेत.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंतच्या घरासमोर खांब बसवणाऱ्या अधिकाऱ्यांना काही लोकांनी विरोध केला. परंतु, आम्ही आमचे काम करत आहोत, हे सरकारी काम आहे. यात कोणी अडथळा आणू नये असे सांगत सबंधित अधिकाऱ्यांनी हे खांब उभा केले आहेत.  ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली ती जागा उत्तराखंडमधील धांडोरा रेल्वे स्थानकाच्या जमिनी आहेत. रेल्वेने या जमिनींवर आधीच खांब रोवले होते. मात्र गेल्या अनेक वर्षांत लोकांनी हे खांब हटवून तेथे अतिक्रमण केले आहे. अनेकांनी येथे पार्किंग केले आहे. बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम राबवून हद्दीचे सीमांकन करण्यासाठी नवीन खांब बसवले आहेत.

Rishabh Pant :  ऋषभ पंत उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर  

उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच उत्तराखंड सरकारने ऋषभ पंतला राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले होते. राज्यातील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ऋषभ पंतची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून दिली होती. यानंतर दोघांचाही एकत्र फोटो समोर आला असून ऋषभ पंतनेही या जबाबदारीवर आनंद व्यक्त केला होता. असे असताना रेल्वेच्या कारवाईमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, अद्यापपर्यंत ऋषभ पंत किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.   

महत्वाच्या बातम्या 

BBL 2022: टी-20 क्रिकेटमधील लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट! 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 5th T20 : गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अब्रू वेशीला
Ind vs Eng 5th T20 : इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
Eng vs Ind 5th T20 : चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
Suryakumar Yadav News : हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget