FIFA WC 2022 Qatar : फुटबॉल (Football) खेळाचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडत आहे.  20 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना वर्ल्डकपचे अॅम्बेसिडर खलिद सलमान (Khalid Salman) यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. जर्मन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर ZDF ला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, समलैंगिकतेमुळे (Homosexuality) आपल्या "मनाचे, मानसिक प्रकृतीचे  नुकसान होते." दरम्यान त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  


कतारच्या दोहामध्ये शूट झालेल्या एका कार्यक्रमात जो मंगळवारी प्रदर्शित होणार असून या मुलाखतीत, खालिद सलमान यांनी समलैंगिकतेबाबत हे वक्तव्य केलं आहे. हे सर्व पुराणमतवादी मुस्लिम देशात बेकायदेशीर आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान काही फुटबॉलर्सनी या स्पर्धेसाठी कतारला येणाऱ्या चाहत्यांच्या हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, विशेषत: LGBT+ कम्यूनिटीच्या व्यक्तींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


काय म्हणाले खालिद सलमान?


मुलाखतीत समलैंगिकतेबाबत बोलताना सलमान म्हणाले, इथे येणाऱ्यांना आमचे नियम स्वीकारावे लागतील, समलैंगिकता इस्लाम धर्मात हराम (पाप) आहे. दरम्यान हराम काय आहे असं विचारलं असताना, सलमान म्हणाले, "मी कट्टर मुस्लिम नाही पण ते (समलैंगिकता) हराम का आहे? कारण त्याने मनाचे नुकसान होते."


Fifa वर्ल्ड कपचं वेळापत्रक कसं?



ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.




कुठे होणार सामने?


हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील.


लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?


Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.



हे देखील वाचा-