T20 World Cup 2022 Semifinal scenario : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सध्या सुपर-12 फेरीचे सामने सुरु आहेत. यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धेतील 35 वा सामना पार पडला, ज्यानंतर ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड एक नंबरला आहे. दरम्यान 12 संघातील 2 संघाचं स्पर्धेतील आव्हान संपलं देखील आहे. तर सेमीफायनलमध्ये असणाऱ्या 4 जागांसाठी 8 संघात अगदी चुरशीची लढत आहे. 

न्यूझीलंडला ग्रुप 1 मधून उपांत्य फेरीत जाण्याची चांगली संधी आहे. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे सध्या चार सामने खेळून प्रत्येकी पाच गुण आहेत. न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. दुसरीकडे इंग्लंडह श्रीलंकेविरुद्ध सामना खेळणार आहे. पण या दोघांमधील जो संघ मोठ्या नेटरनरेटने सामना जिंकेल तोच सेमीफायनलमध्ये जाईल. दुसरीकेड श्रीलंकेने इंग्लंडला हरवले आणि ऑस्ट्रेलियानेही आपला सामना गमावला तर श्रीलंका संघ उपांत्य फेरीत जाईल. पण न्यूझीलंडनेही आपला सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या तिघांसाठीही मार्ग खुला होईल. दुसरीकडे आयर्लंड, अफगाणिस्तान यांचं आव्हान संपलं आहे.

दुसरीकडे भारत असणाऱ्या ग्रुप-2 मध्ये भारतानं आपलं स्थान मजबूत केलं आहे. भारताने शेवटच्या त्यांच्या अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर मात केल्यास त्यांना थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. पण भारताने आपला सामना गमावल्यास त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तर पाकिस्तानचा संघ बाद होईल आणि भारताचे काम सोपे होईल. जर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर ते शेवटचा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रुप 2 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये चुरशीची लढत आहे. नेदरलँड, झिम्बाब्वे मात्र स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. 

कशी आहे गुणतालिका?

सुपर-12 ग्रुप 1

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 4 2 1 1 5 +2.233
2 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
3 ऑस्ट्रेलिया 4 2 1 1 5 -0.304
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 4 2 1 0 2 1.544
6 अफगाणिस्तान 4 0 2 2 2 -0.718

सुपर-12 ग्रुप 2

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 भारत 4 3 1 0 6 +0.730
2 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 +2.772
3 बांगलादेश 4 2 2 0 4 -1.276
4 झिम्बाब्वे 4 1 2 1 2 -0.313
5 पाकिस्तान 3 1 2 0 2 +0.765
6 नेदरलँड्स 4 1 3 0 2 -1.233

हे देखील वाचा