Indonesia Open 2021: भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधुनं (PV Sindhu) आज जर्मनीच्या यव्होने ली (Yvonne Li) विरुद्ध सामन्यात एकहाती विजय मिळवलाय. या विजयासह पीव्ही सिंधुनं इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिलीय. या सामन्यात तिनं जगातिक स्तरावर 26 क्रमकांवर असलेल्या यव्होने लीला 37 मिनिटांत 21-12 आणि 21-18 फरकानं पराभूत केलंय.


आज पहिल्यांदाच यव्होने ली विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात पी.व्ही सिंधु सुरुवातीपासूनच पूर्णपणे नियंत्रणात दिसली. मात्र, दुसऱ्या फेरीत लीनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या फेरीत दोघांना समान गुण मिळाले. मात्र, पुढच्या फेरीत सिंधुनं आक्रमक खेळी करून हा सामना जिंकलाय. इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा स्पेनची बिट्रिज कोरालेस आणि दक्षिण कोरियाची सिम यू-जिन यांच्याशी भिडणार आहे.


सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे. पी.व्ही सिंधूनं सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचलाय. रिओ ऑलिम्पिक 2017 मधील रौप्य पदक विजेत्या सिंधूनं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. यातच पी. व्ही. सिंधू ही जागतिक बॅडमिंटन फेडरेशन अॅथलीट आयोगाची निवडणूक लढवणार आहे. सिंधूसह टोकियो ऑलिंपिकमधील महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकणारी इंडोनेशियाची खेळाडू ग्रेसीया पोल्लीदेखील ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-