Ind vs NZ, 3rd T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज कोलकाताच्या (Kolkata) येथील ईडन गार्डन (Eden Gardens) मैदानावर खेळला जातोय. या सामन्यापूर्वी ईडन गार्डन मैदानाबाहेर बेकायदेशीरपणे तिकीट विक्री केल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 11 जणांना अटक केलीय. अटक केलेल्यांकडून 60 तिकिटं चढ्या दरानं विकली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या सामन्यापूर्वी अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी ईडन गार्डन मैदानाजवळ सुरक्षा वाढवण्यात आली होती, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय.

 

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत- न्यूझीलंड यांच्यात ईडन गार्डनमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. ईडन गार्डनच्या मैदानाजवळ जवळपास 2000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. यात आरएएफ आणि एचआरएफएस जवानांचाही समावेश आहे. साध्या वेशातील अधिकारी देखील ईडन गार्डन्सच्या आजूबाजुच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलंय. 

 

भारत- न्यूझीलंड यांच्यात एकूण 3 टी-20 सामन्याची मालिका खेळली जात आहे. भारतीय संघानं यापैकी दोन सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकलीय. हे दोन्ही सामने जयपूर आणि रांचीमध्ये खेळण्यात आले होते. तर, या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर सुरू आहे. भारतीय संघाचं अखेरच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत निर्वादित वर्चस्व राखण्याचं लक्ष असेल. तर, दुसरीकडे या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरलाय. 

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 

हे देखील वाचा-