CWG Opening Ceremony Live Streaming : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धा आजपासून (28 जुलै) सुरु होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 चं आयोजन इंग्लंडच्या बर्मिंघहममध्ये होणार आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह (Manpreet Singh) करणार आहेत. हे दोघेही कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय संघाचे ध्वजवाहक असणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजला कॉमनवेल्थ स्पर्धेच्या काही दिवस आधीच दुखापत झाल्याने तो ही स्पर्धा खेळणार नाही. दरम्यान त्याच्या अनुपस्थितीत ध्वजवाहक म्हणून वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांचाही विचार झाला होता अशी माहिती भारतीय ऑलम्पिक असोसीएशनने दिली. अखेर सिंधू आणि मनप्रीत यांना हा मान दिला आहे. बॅडमिंटन एकेरीत सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
कुठे पाहता येणार सामने?
भारतात कॉमनवेल्थ स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा