Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहे. अशामध्ये कुस्ती खेळात महिला गटामध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी सहा कुस्तीपटूंची निवड कऱण्यात आली आहे. यामध्ये भारतीय कुस्तीपटू पूजा गेहलोतचं (50 किलो वजनी गट), विनेश फोगट (53 किलो गट), अंशू मलिक (57 किलो), साक्षी मलिक (62 किलो), दिव्या काकरन (68 किलो) आणि पूजा धांडा (76 किलो) यांची नावं सामिल आहेत. कॉमनवेल्थ गेम्स यंदा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. 



भारतीय बॅडमिंटन संघाने रविवारी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. 


त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.


हे देखील वाचा-