Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहे. इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सना (Commonwealth Games 2022) सुरुवात होणार आहे. या खेळांच्या महासंग्रामासाठी भारत सज्ज झाला असून भारताने नुकताच आपला महिला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. कॉमनवेल्थ खेळांमध्ये महिला क्रिकेट सामने होणार असून यासाठी भारताने आपला संघ नुकताच जाहीर केला आहे.
यावेळी कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) संघाचं नेतृत्त्व करणार असून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) उपकर्णधार असणार आहे. भारताने आपल्या 15 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आयसीसीसह बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन दिली आहे. तर नेमका संघ कसा आहे, यावर नजर फिरवू....
भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल.
कॉमनवेल्थमध्येही भारत इतिहास रचणार का?
मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा
- Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा झटका, दिग्गज बॉक्सर मेरी कोमची माघार