Commonwealth Games 2022 : क्रिडा जगतातील एक मानाची स्पर्धा असणारे कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) यंदा इंग्लंडमध्ये पार पडणार आहेत. इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात कॉमनवेल्थ गेम्स 2022 जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय खेळाडूंची घोषणा झाली आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) नेतृत्त्वाखाली 37 खेळाडूंचं पथक इंग्लंडला जाणार आहे.


अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (Athletics Federation of India) यांनी कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या 37 खेळाडूंमध्ये 18 महिला असून उर्वरीत पुरुष आहेत. यामध्ये ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू, हिमा दास, दुती चंद अशा खेळाडूंचा समावेश आहे.  मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2018) सुवर्णपदक विजेत्या मेरीने ऐतिहासिक कामिगिरी केली होती. पण यंदा या 39 वर्षीय बॉक्सर मेरी यंदा मात्र स्पर्धेआधी ट्रायलच्या सामन्यातच जबर दुखापतग्रस्त झाली, ज्यामुळे तिला सामनाही पूर्ण करता आला नाही. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्ससाठी मेरीने विश्व चॅम्पियनशिप आणि आशिया खेळातूनही माघार घेतली होती. 


असं आहे 37 खेळाडूंचं पथक


पुरुष खेळाडू : 


अविनाश साबळे (3000m स्टीपलचेस); नितेंदर रावत (मॅरथॉन); एम. श्रीशंकर आणि मुहम्मद अनिस यहिया (लांब उडी); अब्दुला अबुबकर, प्रवीण चिथ्रवेल आणि एल्डहोस पॉल (ट्रीपल जम्प); ताजिंदरपाल सिंह तूर (शॉटपूट); नीरज चोप्रा, डी.पी. मनू आणि रोहित यादव (भालाफेक); संदीप कुमार आणि अमित खत्री (रेस वॉल्किंग); अमूज जॅकॉब, नोह निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मुहम्मद अजमल, नागनाथल पंडी आणि राजेश रमेश (4x400m रिले). 


महिला खेळाडू:


एस धनलक्ष्मी (100m आणि 4x100m रिले); ज्योती याराजी (100m हर्डल्स ); ऐश्वर्या बी (लांब उडी आणि ट्रिपल जम्प) आणि एन्सी सोजन (लांब उडी); मनप्रीत कौर (Shot Put); नवजीत कौर धिल्लोन आणि सीमा पूनिया अंतिल (थाळीफेक); अनु राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक); मंजू बाला सिंह आणि सरिता रोमित सिंह (हॅमर थ्रो); भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी (रेस वॉल्किंग); हिमा दास, दूती चन्द, सरबनी नन्दा , एमव्ही जिलना आणि एनएस सीमी  (4x100m रिले).


भारतीय खेळाडू कॉमनवेल्थही सर करणार का?


भारतीय बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.


हे देखील वाचा-