Shahrukh Khan Sanjay Dutt Video Punjab Kings IPL 2022 : आयपीलच्या पंजाब किंग्स (Punjab Kings)  या टीमचा खेळाडू शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या खेळामुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो संजय दत्तची (Sanjay Dutt) मिमिक्री करताना दिसत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. 


पंजाब किंग्स टीमच्या सोशल मीडियावरील पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख  ट्रेडमिलवर वॉक करताना दिसत आहे. वॉक करता करता तो संजय दत्तची मिमिक्री देखील करतो. शाहरुख हा संजय दत्तचा 'जादू की झप्पी' हा डायलॉग म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'पंजाब किंग्स फॅमिलीच्या शाहरूख भाई एमबीबीएसला भेटा'.  हा व्हिडीओ 79 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत. 






आयपील ऑक्शन 2022 मध्ये शाहरुखसाठी  पंजाब किंग्स संघानं  9 कोटी रुपये खर्च केले. त्याची बेस प्राइज ही 40 लाख होती. शाहरुख हा गेल्या वर्षी देखील पंजाब किंग्स टीमचा भाग होता. गेल्या वर्षी त्याच्यासाठी टीमनं 5.25 कोटी रुपये खर्च केले. 


हे देखील वाचा-