Lucknow Super Giants vs Gujarat Titans IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) काल खेळण्यात गुजरात टायटन्सनं लखनौसुपर जायंट्सला (LSG vs GT) पराभूत करून प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली आहे. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 63 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खाननं (Avesh Khan) कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्वस्तात माघारी धाडलं. आवेश खानच्या खतरनाक चेंडूवर हार्दिक पांड्या कसा आऊट झाला? याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान गुजरातच्या संघानं 20 षटकांत चार विकेट्स गमावून  144 धावा केल्या. यादरम्यान हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात हार्दिक पांड्या 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. लखनौसाठी आवेश खान 10 वं षटक टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पांड्या झेलबाद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ-



गुजरातच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघ 13.5 षटकांत 82 धावांवर आटोपला. लखनौच्या संघाकडून दीपक हुड्डानं सर्वाधिक 27 धावा केल्या. त्यानं 26 चेंडूत तीन चौकार मारले. तर, कर्णधार केएल राहुल 8 धावा करून माघारी परतला. क्विंटन डी कॉकला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तोही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव पुढे घेऊन जाता आला नाही.


हे देखील वाचा-