एक्स्प्लोर

केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली

पुणे: इंग्लंडचं डोंगराएवढं 351 धावांचं लक्ष्य लिलया पेलल्यानंतर, टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने, मराठमोळ्या केदार जाधवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. शतकवीर केदारसोबतची भागीदारी दीर्घकाळ लक्षात राहिल, असं कोहली म्हणाला. विराट कोहलीनंही विजयाचं श्रेय केदार जाधवच्या खेळीलाच दिलं. कोहलीने 122 आणि केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूत 120 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने हा सामना 3 विकेट्स आणि 11 चेंडू राखून सहज जिंकला. पुण्याच्या मैदानात कर्णधार विराट कोहली आणि मराठमोळा वीर केदार जाधव या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शानदार भागीदारी रचली. त्यामुळंच एका क्षणी 4 बाद 63 अशी अवस्था झाल्यावरही भारतानं पहिल्या वन डेत विजय साजरा केला. विजय विस्मरणात जाणार नाही यानंतर कोहली म्हणाला, "हा विजय सहजासहजी विस्मरणात जाणार नाही. आम्ही आधी 350 धावा दिल्या त्यानंतर 60 धावांच्या आसपास चार विकेट गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज दबदबा निर्माण करत होते. अशावेळी चांगल्या भागीदारीची गरज होती. केदारने महत्त्वाची आणि आश्वासक खेळी केली. 4 बाद 63  अशी दयनीय स्थिती झाली असताना, केदार मैदानात आला. त्यावेळी आपल्याला 150 पर्यंत विकेट टिकवायची आहे, त्यानंतर इंग्लंडचे खेळाडू आपोआप चिंताग्रस्त होतील, असं मी केदारला सांगितलं. मग केदारने लगावलेले फटके पाहून मी आश्चर्यचकीत झालो. चोरट्या धावा घेण्यासाठी मी त्याला खूप पळवलं. पण त्याने उत्तम फलंदाजी केली". केदारकडे खूप क्षमता आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन गरजेच्यावेळी शतक ठोकणं हे खूपच खास आहे. केदारने त्याच्या कुटुंबासमोर, घरच्या मैदानात ठोकलेल्या शतकामुळेच टीम इंडिया विजयपथापर्यंत पोहोचली, असं कोहलीने नमूद केलं. केदार जाधवच्या याच आश्वासक खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. देशासाठी खेळल्याचा अभिमान - केदार जाधव यावेळी केदार जाधव म्हणाला, "माझ्या घरच्या मैदानात, कुटुंबासमोर मी एक उत्तम खेळी करुन मी देशासाठी सामना जिंकला याचा मला अभिमान आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या संघाला जिंकवता, देशाचा अभिमान वाढवता, तेव्हा ती खूपच मोठी बाब असते". या सामन्यासाठी केदार जाधवचे आई-वडिल, पत्नी आणि मुलगीही आली होती. त्यांच्यासमोर केदार जाधवने शतक ठोकून त्यांना अनोखी मानवंदना दिली. कोहलीचे आभार याशिवाय केदार जाधवने कर्णधार कोहलीचेही आभार मानले. "मोठं लक्ष्य कसं पूर्ण करायचं, हे  कर्णधार कोहलीने यापूर्वी अनेकवेळा दाखवलं आहे. त्यामुळेच मला इंग्लंविरुद्धची खेळी करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी मी अनेक फलंदाजीच्या संधी गमावल्या होत्या. त्यातच विराटसोबतही फलंदाजी करणं आणि त्याची फलंदाजी जवळून पाहण्याची संधीही चुकली होती. पण या सामन्यानिमित्त ती संधी मिळाली, त्यामुळे हा माझ्यासाठी खास दिवस होता", असं केदार जाधवने नमूद केलं. दुसरीकडे विराटसोबत धावणं हे मोठं आव्हन असल्याची कबुली केदारने दिली. संबंधित बातम्या
केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी
भारताकडून दुसऱ्यांदा 350 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग
पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
पुण्यात 'विराट' सेनेपुढे सायबांवर संक्रांत, टीम इंडियाचा धमा'केदार' विजय

महत्त्वाच्या बातम्या

ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Duleep Trophy : सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
सरफराज खान टीम इंडियात येताच मोठा ट्विस्ट; 25 वर्षांच्या खेळाडूचं नशीब एका रात्रीत पालटलं, संघात झाली निवड
Sourav Ganguly : आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
आधी पत्र आलं... मग थेट जीवे मारण्याची धमकी! ‘ती’ पत्र मिळताच सौरव गांगुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, धमकीमागे कोणाचा हात? खळबळजनक माहिती समोर
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget