T20 World Cup 2021 : टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानच्या प्लेईंग11ची PCBकडून घोषणा, वाचा कुणाचा समावेश
Pakistan Playing 11: 2021 टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठा सामना उद्या 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Pakistan Playing 11: 2021 टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठा सामना उद्या 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. रविवारी 24 ऑक्टोबरला दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ आमनेसामने येतील. जेव्हा जेव्हा हे दोन देश क्रिकेटमध्ये समोरासमोर येतात, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचते. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान भारताविरुद्ध सलामीला येतील. फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात तिघांनीही एकाच क्रमाने फलंदाजी केली होती. यानंतर अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज चौथ्या क्रमांकावर आणि शोएब मलिक पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसतील.
Pakistan's 12 for their #T20WorldCup opener against India.#WeHaveWeWill pic.twitter.com/vC0czmlGNO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2021
हे तीन खेळाडू फिनिशरची भूमिका बजावतील
स्फोटक फलंदाज आसिफ अली, अष्टपैलू इमाद वसीम आणि शादाब खान फिनिशरची भूमिका साकारतील. दुसरीकडे, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी वेगवान गोलंदाजी विभागात दिसतील.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम ( कर्णधार), असिफ अली, मोहम्मद रिझवान, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तानचा 15 जणांचा संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम कनिष्ठ, सरफराज अहमद (विकेटकीपर), शाहीन शाह आफ्रिदी आणि शोएब मलिक.
भारतीय संघाचे सुपर 12 मधील सामने :
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध स्कॉटलॅंड : संध्याकाळी 07.30 वाजता
- 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध नामिबिया : संध्याकाळी 07.30 वाजता